Loading...
आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेअंतर्गत माननीय श्री पोपटराव पवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली  वेळे तालुका त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक हे गाव आदर्श गाव पूर्ण झाले त्यांची पाहणी करतांना संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्त दिनांक ११ एप्रिल २०२३
आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेअंतर्गत माननीय श्री पोपटराव पवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली  वेळे तालुका त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक हे गाव आदर्श गाव पूर्ण झाले त्यांची पाहणी करतांना संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्त दिनांक ११ एप्रिल २०२३
25 September 2023

आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेअंतर्गत माननीय श्री पोपटराव पवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली  वेळे तालुका त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक हे गाव आदर्श गाव योजनेसाठी निवडण्यात आले होते. प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून श्री चक्रधर स्वामी बहुउद्देशीयसंस्था काम करोत आहे. गावाचे माथा ते पायथा नियोजन करून गाभा क्षेत्रातील कामांमध्ये विविध कामे करण्यात आली
या योजनेमध्ये गावातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचेल अशा प्रकारचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यात आला. ज्यामध्ये भूमिहीन ग्रामस्थांसाठी उपजीविकेचे माध्यमे निर्माण करणे कृषी व कृषी पूरक उद्योगांना चालना देणे, महिला बचत गटांची नोंदणी करून बँकेत खाते उघडणे. तसेच गावामध्ये सप्तश्रुतीचे पालन होण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणे इत्यादी.. उपक्रमांचा समावेश सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये करण्यात आला होता. 
सविस्तर प्रकल्प अहवालात नमूद केलेल्या उपक्रमांपैकी soil conservation  ची म्हणजेच मजगीची काम गावामध्ये सुरू आहेत. तसेच गॅबियन स्ट्रक्चर पुढील आठवड्यामध्ये लवकरात लवकर पूर्ण होईल. गावातील जमिनीचे होणारे सपाटीकरण बघून ग्रामस्थांना मनोमन बरे वाटले व इथून पुढे चांगल्या दर्जाची शेती गावामध्ये कसता येईल व दोन हंगामात शेती करता येईल  अशी खात्री ग्रामस्थांना वाटली. अनुषंगाने संस्थेने हा उपक्रम हाती घेतल्यामुळे संस्थेला याबाबत समाधान तर आहेत मात्र यानिमित्ताने गावातील रोजगारासाठी चे स्थलांतर थांबणार आहे.
ह्या निमित्ताने सर्व आदर्श गाव कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी ह्यांचे मनपूर्वक आभार.
गावातील गाभा क्षेत्रातील विविध कामे चालू असताना संस्थेचे सचिव नितीन सोनवणे यांनी कामाची पाहणी केली त्या निमित्ताने आमच्या गोदावरी कन्सल्टंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड चे सर्व सहकारी ह्यांनी गावाला भेट देऊन मृद व जलसंधारणाचे कामाचे महत्त्व समजून घेतले.
तरी ह्या कामासाठी प्रोफेसर श्री सुरवाडे सर आणी अंबलबजावणी यंत्रणा व गावामध्ये समन्वयन साधनायचे महत्वाचे काम तांत्रिक कार्यकर्ता गोकुळ पांडुरंग टोंगारे ह्यांनी केले.

.

We Serve Excellence.