सूर्यवंशी गुजर समाज विकास मंच, नाशिक आयोजित गुणवंत विद्यार्थी व मान्यवर यांचा सत्कार समारंभ व भव्य समाज मेळावा नुकताच नाशिक मधील सिडको येथे संपन्न झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी विकास विभाग नाशिक अप्पर आयुक्त मा. श्री. संदिप गोलाईत साहेब हे तर प्रमुख पाहुणे म्हणून गोदावरी कन्सल्टंट सर्विसेस प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर मा. श्री. नितीन सोनवणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपस्तीत समाज बांधव, महिला, युवक-युवती, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
समाज बांधवाना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनेसंदर्भात मार्गदर्शन या वेळी मा. नितीन सोनवणे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्फूर्ती योजना, पी. एम. विश्वकर्मा अशा विविध शासनाच्या योजनेतून बँक आर्थिक स्वरुपाची मदत करत असते व त्यावर शासन अनुदान देत असते अश्या स्वरूपाच्या रोजगाराच्या विविध संधी आहेत तरुण- तरुणी यांनी याकडे लक्ष केंद्रित करून स्वतः उद्योजक कसे निर्माण व्हाल याकडे लक्ष केंद्रित करावे.
शासन स्तरावर सरकारी नोकरीचे प्रमाण कमी झाले असून त्याच बरोबर शासनाने विविध शासकीय योजना मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्या योजनाचा लाभ घ्यावा, स्वतःचा विकास झाल्यास समाजाचा विकास देखील आपोआप होत असतो, काही मार्गदर्शन लागल्यास व समाजाची सेवेची संधी मिळाल्यास मी कायम तत्पर असेल असे मा. सोनवणे यांनी कार्यक्रमात उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले.