Loading...
सक्सेस ग्लोबल फाउंडेशनतर्फे महापालिकेच्या नऊ शाळांमध्ये मियावाकी फॉरेस्ट (वन) प्रकल्प राबविला जात असून त्यातील सहा शाळांमध्ये प्रकल्प पूर्णत्वास आला आहे.
सक्सेस ग्लोबल फाउंडेशनतर्फे महापालिकेच्या नऊ शाळांमध्ये मियावाकी फॉरेस्ट (वन) प्रकल्प राबविला जात असून त्यातील सहा शाळांमध्ये प्रकल्प पूर्णत्वास आला आहे.
25 September 2023

नाशिक :महापालिका, स्मार्ट स्कूल (Smart School) प्रकल्प सल्लागार पॅलेडियम कन्सल्टिंग कंपनी, रोटरी क्लब, सक्सेस ग्लोबल फाउंडेशनतर्फे महापालिकेच्या नऊ शाळांमध्ये

मियावाकी फॉरेस्ट (वन) प्रकल्प राबविला जात असून त्यातील सहा शाळांमध्ये प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. (Miyawaki Forest Project is being implemented in 9 schools of Municipal Corporation nashik news)

एका शाळेत सहा असे एकूण सहा शाळांमध्ये एक हजार ४५२ वृक्षांचे वृक्षारोपण झाले आहे. संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून प्रकल्प हस्तांतरण करण्यात आले. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे माजी जिल्हाध्यक्ष दादा देशमुख, जिल्हा गव्हर्नर रमेश मेहेर, जिल्हा सचिव रणजित साळवे, अध्यक्ष एन्क्लेव्ह नाशिक सलीम बटाडा, सीमा पाचाडे, राहुल महाजन, हर्षद वाघ, अमित टेंभुर्णे आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापिका छाया माळी यांनी प्रस्तावना केली. शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी मियावाकी फॉरेस्ट प्रकल्प तसेच, स्मार्ट स्कूल प्रकल्प याविषयी माहिती दिली. मियावाकी फॉरेस्ट प्रकल्पासाठी ठिबक सिंचन प्रणालीही उपलब्ध केली आहे.

प्रकल्पांतर्गत शाळेत सीता अशोक, जरूळ, बकुळ, नीम, मोहगिनी, करंज आदी विविध प्रकारच्या २४२ रोपांची लागवड केली आहे. शिक्षक प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन तर शिक्षक अंकुश तळपे यांनी आभार मानले.

.

We Serve Excellence.