Loading...
स्फूर्ती या योजनेच्या निमित्ताने सक्सेस  ग्लोबल फाउंडेशन (Technical Agency) भीमा खादि मंडळ यांच्या प्रोजेक्ट कच्छ येथे भेट देण्यात आली
स्फूर्ती या योजनेच्या निमित्ताने सक्सेस  ग्लोबल फाउंडेशन (Technical Agency) भीमा खादि मंडळ यांच्या प्रोजेक्ट कच्छ येथे भेट देण्यात आली
25 September 2023

काही दिवसापूर्वी आम्हाला स्फूर्तीच्या कामानिमित्त कच्छ ला जाण्याचा योग आला. भीमा खादी मंडळ लिलापूर यांचे समन्वयक हसमुख भाई पटेल हे आमच्या सोबत होते. 
   तसं तर कच्छ हा जिल्हा पश्चिम भारतातील गुजरात राज्याचा एक सर्वात मोठा जिल्हा आहे. भीमा खादी मंडळ यांचं कच्छ मध्ये महिला विकास, शिक्षण, पारंपारिक कला यामध्ये खूप मोठे काम आहे. 
   आम्हाला त्यांनी तिथल्या बऱ्याच गावात दौरा केल्यानंतर आम्हाला महिलांच्या समस्येची दाहकता समजली. तेथील श्री ही पूर्ण वेळ घुंगट मधेच असते  त्यांची ही कला जी आहेआईपासून मुलीला शिकवलेल्या कौशल्याने ती पिढी घडवणारी कला बनली. ते सणांच्या प्रसंगी आणि देवतांना सजवण्यासाठी आणि उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी कपड्यांवर भरतकाम करतात.पण त्या स्त्रियांना चार भिंतीच्या बाहेर जाण्याची सुद्धा परवानगी नाही. 
   पण घराच्या चार भिंतीत राहूनही कलेविषयीची आवड त्यांचे ते जोपासण्यासाठीचे प्रयत्न  कामात असलेला हातखंड हे कमालीचे होते. फक्त अडचण होती ती नव्या संधीची नव्या उपकरणांची आणि कला जोपासता जोपासता मिळणाऱ्या उत्पन्नाची. 
   आता मात्र स्फूर्ती या योजनेतून भीमा खादि मंडळ यांच्या प्रयत्नाने व सक्सेस  ग्लोबल फाउंडेशन (Technical agency) यांच्या सहकार्याने  थोड्याच दिवसात त्यांना स्फूर्ती ह्या केंद्र सरकारच्या मायक्रो, स्मॉल अँड मिडीयम एंटरप्रायझ विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेतून कलाकार महिलांना  नवीन सामाईक सुविधा  मिळणार आहे. ज्या मध्ये  Design Center, Training Center, Production Center, Product outlet Etc. माध्यमातून नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यांच्या कलेला जागतिक स्तरावर बाजारपेठ ही मिळेल व  व त्यांची कला ही सर्व दूर पोहोचून आर्थिक सुबत्ता पण प्राप्त होईल याचा आम्हाला विश्वास आहे.

.

We Serve Excellence.