आज दिनांक. १८ जुलै २०२३ रोजी आदर्शगाव योजनेत सक्रीय असलेले आदर्शगाव गाव वेळे ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथे महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्याच्या सुचना केल्या आहेत त्या नुसार आदर्शगाव वेळे या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मा. श्री. नितीन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला, यावेळी उपस्तीत वेळे गावचे सरपंच- श्री. देवचंद बेंडकोळी, ग्रामसेवक- पाटील मँडम, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामकार्यकर्ता- श्री. किसन खोडे, तांत्रिक कार्यकर्ता श्री. गोकुळ टोंगारे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर विभागाचे मा. राम खंदारे सर, कृषी सहाय्यक श्रीम. तडवी मँडम, प्राथमिक आरोग्य केंद्र वेळे कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी, गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्तीत होत्या.
आदर्शगाव वेळे ता. त्र्यंबकेश्वर हे एक आदिवासी बहुल भागातील गाव असून सुमारे ७०० लोकसंख्या असलेले गाव आहे, तालुक्यापासून सुमारे २५ किमी अंतर असलेले हे गाव डोंगराळ भागात वसलेले आहे हे गाव आदर्शगाव योजनेत सहभागी झाल्यापासून विविध योजनेत सहभागी होऊन विकासच्या दिशेने वाटचाल करत आहे, या गावात श्री. चक्रधर स्वामी बहुउद्देशीय संस्था, दलपतपुर ता. त्र्यंबकेश्वर या संस्थेच्या माध्यमातून आदर्शगाव योजनेची अंमलबजावणी चालू असून आज या ठिकाणी बचत गट प्रतिनिधी व गावातील महिलांचा मेळावा आयोजन केले होते या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना महिलांच्या साठी राबविल्या जातात, त्याची माहिती या महिलांना दिली, सुरु असलेल्या बचत गट यांना आदर्शगाव योजनेतून विविध व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात प्रोत्साहन देऊन त्यांना मंडप साहित्य, पीठ गिरणी, शेळी पालन, कुकुट पालन, भात गिरणी अशा स्वरुपात त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी या बाब निहाय गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. व महिलांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी महिलांना देण्यात आली, अशा पद्धतीने हा मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला..